शहादा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू


एएमसी मिरर : वेब न्यूज
वडछिल (ता. शहादा) येथे गणपती विसर्जनाच्या वेळी जलसंधारणाच्या कामातून तयार केलेल्या तलावात सहा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातल्या  चार जणांचा समावेश असल्याचे समजते.
कैलास संजय चित्रकथे (१७), सचिन सुरेश चित्रकथे (१९), विशाल मंगल चित्रकथे (१७), दीपक सुरेश चित्रकथे (२१), रविंद्र शंकर चित्रकथे (२९) सागर आप्पा चित्रकथे  (२०) असे मृतांची नावे आहेत.
गणेश विसर्जन केल्यानंतर आंघोळ करण्यासाठी गावापासून एक किलोमीटर उत्तरेला असलेल्या तलावात अंघोळीला गेले होते. यावेळी एक मुलगा पाण्यात बुडायला लागला, यानंतर या मुलांनी आरडाओरड केली. इतर पाचही जन त्यास वाचविण्यासाठी धावले असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे ऐन सणासुधीत गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज कुमार खैरनार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post