'दादा समोर या.. नाही तर मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही'


एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना सोशल मीडियात एका कार्यकर्त्याने टाकलेली पोस्टही भलतीच व्हायरल झाली आहे. बाबू आवारी या अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्याने फेसबूकवर अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पोस्ट टाकली आहे.
"आदरणीय दादा तुम्ही जर आम्हाला 6.00 वाजता दिसले नाहीत, तर मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही.. आदरणीय दादा तुमच्यासाठी काही पण.." अशी पोस्ट बाबू आवारी या युवकाने शेअर केली आहे. त्याच्या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post