नगर : नवलेनगरला भरदिवसा घरफोडी


एएमसी मिरर : नगर
आतून लोटलेला दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरांनी उघडून आत प्रवेश केला. घरातील कॉटवर काढून ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले. ही घटना गुलमोहोर रोडवरील पोलिस चौकी मागील नवलेनगर येथील रिद्धी सिद्धी टॉवर येथे रविवारी (दि.1) सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी राजेंद्र हिरामण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून भाद्विक 454, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना. जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post