रेल्वे कर्मचा-यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस


एएमसी मिरर : वेब न्यूज 
भारतीय रेल्वेच्या 11 लाख कर्मचा-यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती आज दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर 2,024 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही सलग 6 वी वेळ आहेमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीही सहभाग घेतला.
सरकार ई-सिगारेटवर बंदी लावत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कॅबिनेटच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, ई-सिगारेटच्या उत्पादन, निर्यात, आयात आणि वितरणावर देखील बंदी लावण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post