एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील नाभिक समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील सुधीर उर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाभिक समाजाच्या सदस्यांना आर्थिक प्रगतीसाठी मदत करणे, त्यांच्या पारंपारिक व्यवसाय आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी आवश्यक साधन सामुग्री देणे, ही कामे प्राधान्याने या मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.
या निवडीबद्दल इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी श्री.राऊत यांचे अभिनंदन केले.
Post a Comment