नगर-पुणे महामार्गावर अपघात; 2 ठार, १५ जखमी


एएमसी मिरर : नगर
नगर-पुणे महामार्गावर ट्रक आणि मिनी बसच्या अपघात एकाच कुटुंबातील 2 जण ठार, तर 15 जण जखमी झाले आहेत. जातेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची ठप्प झाली होती. दरम्यान, जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


लक्ष्मी वसंत दोमल (वय 65, रा. सातभाई गल्ली, तोफखाना, नगर), विश्वनाथ बाळराम धीमन (वय 50, रा. लोणार गल्ली, नगर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बस मधील इतर पंधराजण जखमी आहेत. हे सर्व नातेवाईक आळंदी (जि.पुणे) इथे एका दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून नगरकडे परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास जातेगाव फाट्याजवळ अपघात झाला. नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचा पुढचा टायर फुटून ट्रक डीव्हायडर तोडून नगरकडे येणाऱ्या मिनी बसवर धडकली. यात बस मधील दोन प्रवासी जाग्यावरच ठार झाले, तर इतर सर्व पंधरा जण जखमी झाले. घटनेनंतर सुपा पोलिसांनी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post