जिल्हा बँक, थोरात कारखान्याला ‘सहकार निष्ठ’ पुरस्कार


एएमसी मिरर : नगर 
सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थाना सहकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात नगर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व संगमनेरातील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ‘सहकार निष्ठ’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सन 2017-18 या वर्षासाठी सहकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थीं संस्थांची नावे सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. त्यात जिल्हा बँक विभागातून नगर जिल्हा बँकेस तसेच साखर कारखाना विभागातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सहकारमहर्षिी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची ‘सहकार निष्ठ’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अन्य पुरस्कारप्राप्त संस्था
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था (सहकार भूषण), राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रीया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था (सहकार भूषण), अकोलेतील सिध्देश्वर सहकारी दूध संस्था (सहकार भूषण).

Post a Comment

Previous Post Next Post