'अमोल कोल्हेंची यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल'


एएमसी मिरर : वेब न्यूज

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळावे यासाठी खासदार डॉ. कोल्हे महाराष्ट्रातले किती किती मतदारसंघ फिरताहेत. लोकांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देऊन भावनेचं राजकारण केलं. कुठं आहेत ते आता? ते जिथे जिथे जातात तिथले लोक पक्षाला सोडून निघत आहेत. शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली.
त्यांनी केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावावर भावनेचं आणि जातीय राजकारण केलं, असा आरोपही त्यांनी कोल्हेंवर केला. अमोल कोल्हेंना विजयी करून आता लोकांना पश्चात्ताप  होतोय. त्यांनी मतदारसंघात भावनेचे आणि जातीय समीकरणाने राजकारण केले. संसदेच्या ३७ दिवसांत १८ दिवस ते संसदेत होते. बाकीचे १९ दिवस ते गैरहजर होते. मतदारसंघातदेखील ते दिसत नाहीत. किती वेळा ते भोसरीत आले? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Post a Comment

Previous Post Next Post