कोकणाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रही भगवा करणार : आदित्य ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
कोकणाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रही भगवा करण्यासाठी मला आपले आशिर्वाद द्या. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. आपल्या सर्वांचे दर्शन घ्यायाला आलो असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे सांगितले. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळात दाखल झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसामान्य माणसाचा आवाज ऐकून त्या माणसाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न असतो. जनआशीर्वाद यात्रेतून मी लोकांचे प्रश्न समजून घेत आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र कर्जमुक्त आणि बेरोजगारीमुक्त करण्यासाठी मी निघालो
असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले . त्यांचे प्रथम वेंगुर्ल्यात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर कुडाळ आणि कणकवली येथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री
दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post