एएमसी मिरर : वेब न्यूज
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. वरळी मतदारसंघातून लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आदित्य ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
“आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे. मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Post a Comment