गोंदियात घरफोडी करणारी टोळी नगरमध्ये जेरबंद


एएमसी मिरर : नगर
गोंदिया जिल्ह्यातून चोरी करून आणलेले 16 तोळे सोने, अकराशे ग्रॅम चांदीचे दागिने व पाच लाख रुपये किंमतीच्या हुंडाई कारसह चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केडगावमध्ये अटक केली आहे.
बिपीन जगतबहादूरसिंग गहरवार (वय-28), जयेश चंद्रकांत रुपारेल (वय-22), दिपेश चमनलाल टेंबरे (वय-27), राजकुमार बुधराम पारधी (वय-24) सर्व रा.गोंदिया अअशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. शनिवारी (दि.31) एक लाल रंगाची हुंडाई कार (क्र.एम एच-40 बीई-2125) चार ईसम केडगाव परिसरात संशईतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केडगाव परिसरात जाऊन कारचा शोध घेतला. अंबिकानगर बस स्टँडजवळ संबंधीत कार आढळली. त्यांच्याकडे विचारणा केली असता ते नगरच्या दिशेने कारसह पळून जात असल्याने त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून सोने, चांदीसह कार ताब्यात घेतली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना मुद्देमालासह गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीसांकडे देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post