एएमसी मिरर : नगर
राज्याच्या विविध भागांत काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्याग करून भाजप-सेनेत प्रवेशाचे पेव फुटलेले असताना नेवासा तालुक्यात मात्र उलटे वारे वाहात आहे. मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे आकर्षित होऊन जोरदार 'इनकमिंग' सुरू असल्याचे चित्र आहे. नेवासा, भेंडा, कुकाणासह आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या होमपीचवर देवगावात प्रामुख्याने भाजपला खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादीचा त्याग केल्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केले आहे. तालुक्यातील मुळा साखर कारखाना, नेवासा बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे पाच गट, मुळा बँक, एवढी सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुरकुटेंची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
Post a Comment