सुप्रिया सोबतच्या वादानंतर अजित पवारांचा राजीनामा?


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वयाच्या 79 व्या वर्षी मोठ्या मेहनतीने ऊभारलेला पक्ष बुडताना पाहावा लागत आहे. पक्षाची वाताहत झालेली पाहून महाराष्ट्राच्या दौ-यावर गेले असताना त्यांना मध्येच ईडीने त्यांच्यावर कथित शिखर बॅंक घोटाळ्यावरून गुन्हा दाखल केला. यामुळे राज्यभरातून सरकारचा निषेध करण्यात आला. परंतू डेंगूच्या आजाराने ग्रस्त सुप्रिया सुळेंना मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेरही पडता आले नाही. उतारवयात आपल्या बाबांना हा दिवस पाहायला मिळालाय याची सल त्यांनी भाऊ अजित पवार यांच्याजवळ बोलून दाखवली आणि यावरूनच त्यांच्यात वादाला सुरूवात झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, अजित पवार आज दिवसभरात माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे. त्यांनी आपलं मौन सोडल्यानंतरच ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post