अजित पवारच त्यांची भूमिका मांडतील : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांनी तातडीने मुंबई गाठली. दीड तास अजित पवारांसोबत  त्यांची बैठक पार पडली. बैठक संपली असून, चिंता करण्याचं काहीही कारण नाही, अजित पवारच तुमच्याशी बोलतील, अशी माहिती शरद पवार यांनी बैठकीनंतर दिली आहे.
अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा का दिला?  शरद पवारांनी त्यांची काय समजूत घातली? शरद पवार यांची शिष्टाई यशस्वी झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता अजित पवार यांच्याकडूनच मिळणार आहेत. अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे अजित पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post