एएमसी मिरर : वेब न्यूज
लोकसभा निवडणुकी दरम्यान युतीसाठी आम्हाला 3 ते 4 महिने खेळवत ठेवणा-या काँग्रेसच्या वागणुकीत कुठलाही फरक पडला नसून त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही काँग्रेससोबत युती करणार नसल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आम्ही आघाडीच्या चर्चेची दारे बंद केली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या बैठकीत आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. मात्र त्या प्रस्तावाचे अजूनही उत्तर आलेले नसल्याचे वंचितने म्हटले आहे.
गणपती विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केले आहे.
Post a Comment