दहशतवाद्यांवर कारवाई करा; अमेरिकेची पाकिस्तानला समज


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीविरुद्ध पाकिस्तान कशी कारवाई करतो, यावर भारत – पाकिस्तानमधील तणाव कमी होणे अवलंबून आहे, अशी समज अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दिली आहे.

अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशियाविषयक प्रभारी उपमंत्री एलिस वेल्स यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवेळी दहशतवादाला पाठिंबा देण्यावरून पाकिस्तानची कानउघडणी केली. ‘जमात उद दावा’चा म्होरक्या हाफिज सईद आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर यांच्यावर खटले चालवा, अशी तंबी दिली.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पाकिस्तान काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला कोणीही साथ देत नाही; उलट अमेरिका वारंवार पाकिस्तानला दहशवाद्यांवर कारवाई करण्याबाबत बजवतो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post