भारतात आता घुसखोरांनना स्थान नाही : अमित शाह


एएमसी मिरर : वेब न्यूज
एनआरसीवर (नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची) अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन असल्याचे केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. भारतात आता घुसखोरांना स्थान दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.
अमित शाह गुवाहाटीमध्ये आयोजित पूर्वोत्तर परिषदेच्या 68 व्या सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी आसाममधील अवैध नागरिकांवर निशाणा साधला. अमित शाह पूर्वोत्तर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाले आहे.
दरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील एनआरसीची अंतिम यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात असून त्यात एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रीब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील, असे सांगण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post