अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


एएमसी मिरर : वेब न्यूज
बॉलीवूड अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान आहे. या पुरस्काराबाबत जावडेकर यांनी माहिती देताच अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात पोस्ट झाल्या.
अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर रूपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला.
दरम्यान, सिनेसृष्टीतील महानाय्कास हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वानुमते या पुरस्कारासाठी अमिताभ याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post