राज्यात 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल


एएमसी मिरर : वेब न्यूज
दिवाळीपूर्वीच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडनुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहेत. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे.

असा आहे विधानसभा निवडणूक कार्यक्रम

* अर्ज भरण्याची तारीख  : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर2014 मधील पक्षीय बलाबल
भाजप - 122 जागा
शिवसेना - 63 जागा
काँग्रेस - 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा
इतर - 20 जागा
एकूण - 288 जागा

2014 मध्ये विभागनिहाय कोणत्या पक्षाला किती जागा?
मुंबई (36) : भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02
कोकण (39) : भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06
पश्चिम महाराष्ट्र (70) : भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04
उत्तर महाराष्ट्र (35) : भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05
विदर्भ (62) : भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03
मराठवाडा (46) : भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03
इतर : 02

एकूण (288) : भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

Post a Comment

Previous Post Next Post