एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. सर्वाधिक राजीनामे स्वीकारणारे ते पाहिले अध्यक्ष झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे राज्यभर वाहू लागले आहेत. अशातच अनेक आमदार, खासदारांनी राजीनामे देत इतर पक्षात प्रवेश केला आहे. राज्यातील २६ आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला असून ते राजीनामे अध्यक्षांनी स्विकारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या असतांना अनेक दिग्गज नेते , आमदार , खासदार, पदाधिकारी पक्षांतर करीत आहेत. यामध्ये राज्यातील आमदार , खासदारांचाही समावेश आहे. त्यामुळे येणारी निवडणूक औत्युक्याची ठरणार आहे.
Post a Comment