एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, यात उमेदवार निश्चितीसह शिवसेनेबरोबरचे जागावाटपही अंतिम केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावरून भारतात परतले. त्यामुळे आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार व युतीच्या जागावाटपावर या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत. मोदी यांच्याबरोबरच भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील, असे सांगण्यात आले.
Post a Comment