'रम्या' म्हणतो हे 'घड्याळ' भंगारातच जाणार!


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने साकारलेला ‘रम्या’ सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. 'रम्याचे डोस' या मालिकेतून भाजपाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बिघडलं असून ते आता भंगारातच जाणार!" अशी टीका भाजपाने रम्याचे डोसच्या माध्यमातून केली आहे.

ईव्हीएम, कलम ३७० असो किंवा भगवा झेंडा.. दोघांची मत परस्पर विरूद्ध. दादांनी राजीनामा सुद्धा काकांना न विचारता दिला आणि त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायत “काका सांगतील तो अंतिम निर्णय” असं एक व्यक्ती रम्याशी संभाषण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावर रम्याही त्यांना उत्तर देतो. 'अरे हे घड्याळ ना… एक फटका दिला की थोडावेळ बरोबर चालतंय'. 'पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेने फिरायला लागतात'. हे आता काही दुरूस्त होणार नाही… भंगारातचं जाणार, असं रम्या त्या व्यक्तीला सांगताना दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियात या पोस्टने धूमाकूळ घातला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post