मतदारसंघात आलेली शिकार मी करणार : राम शिंदे


एएमसी मिरर : नगर
माझ्या मतदारसंघात बाहेरची शिकार आली आली आहे. ती शिकार मी करणारच आहे मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे ही शिकार माझ्या हातातुन जाते की काय असा टोला पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी सरपंच परीषदेत रोहित पवार यांना लावला.
शुक्रवारी जामखेड येथे सरपंच परिषद महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की मंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्यामुळे मतदार संघातील जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहेत. पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाण्याची योजना मतदार संघात आणणार असून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार आहे. आम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी आणला परंतु जाहिरात केली नाही विरोधक मात्र चाॅकलेट गोळ्या वाटतात पण त्यावर स्वतः चा फोटो छापतात. पाच वर्षांत केलेल्या विकास कामामुळे मतदार संघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरून माणसे आणावे लागत आहे. मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे त्यामुळे बाहेरचे पार्सल बाहेरच पाठवणार आहे. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला त्याचा बदला मी त्यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणारच आहे. विकास कामांमुळे विरोधात कोणीही उभे राहिले तरी मी ते सावज टिपणार आहे असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी ५८ पैकी ५० सरपंच हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post