एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुका जाहीर होताच भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग आलाय. विधानसभेला सामोरे जातांना भाजपने 'नव महाराष्ट्र, नऊ संकल्प' अभियान हाती घेतले आहे. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉफी विथ लीडर अभियानही सुरू केले आहे. पाच वर्षात केलेल्या कामांना घराघरात पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्री देखील लोकांच्या घरी जाणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, युती ही होणारच आणि लवकरच तुम्हाला त्या संदर्भातली बातमी मिळेल. तसेच 75 वर्ष पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना तिकीट दिलं जाणार नाही. अजित पवार यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा आणि सरकारचा काहीच संबंध नाही. जर आमच्या सरकारने असं काही केलं असेल त्यांनी आमच्या विरोधात पीआयएल दाखल करा, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिलंय. या प्रकरणी एका व्यक्तीने जनहित याचिका टाकली आणि कोर्टाने या संदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण काँग्रेसच्या काळातलं आहे. तसेच पवार कुटुंबात शांती असू दे, यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रार्थना करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे हे नऊ संकल्प असणार आहेत
1) युवकांना स्थायी रोजगार
2) दुष्काळमुक्ती
3) प्रत्येक नागरिकाला सर्व अधिकार
4) शेवटच्या व्यक्तीचा विकास
5) सशक्त महिला
6) बळीराजाची समृद्धी
7) प्राथमिक आरोग्य/उपचार
8) पारदर्शक आणि स्वच्छ कारभार
9) महाराष्ट्रच वैभव
Post a Comment