‘कलम ३७०’ हटविण्याचा विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या'


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गोरेगावमधील नेस्को संकुलात जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांनी व्याख्यान देत अप्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी कलम ३७० आणि ३५ए वरून शरद पवारांसह विरोधकांवर हल्लाबोल केला. “ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वराज्य निर्माणाची सुरवात इथूनंच झाली. मुघलांशी लढाई येथूनच सुरू झालं. त्यामुळे कलम ३७० आणि ३५ ए हटविण्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं जागा दाखवून द्यावी,” असे आवाहन शाह यांनी यावेळी केले.
अमित शाह म्हणाले की, “अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणारा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. आता जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचे अंग झाले आहे. पण, शरद पवार आणि राहुल गांधी कलम ३७० व ३५ ए चा विरोध करत आहे. मला शरद पवार आणि राहुल गांधी यांना सांगायच की, जम्मू काश्मीर हा भाजपासाठी राजकीय मुद्दा नाही. हा देशाच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी ते कलम ३७० व ३५ ए विरोधातील आहेत की बाजूचे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं,” असं शाह म्हणाले.
“पुलवामासारखं काही घडल नाही तर महाराष्ट्रात बदल घडेल”असं शरद पवार औरंगाबाद येथे बोलताना म्हणाले होते. पवार यांच्या विधानाचा शाह यांनी समाचार घेतला. शाह म्हणाले,”हे नाही झाल. ते नाही झाल तर आम्ही जिंकू असं काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणत आहे. पण काहीही झाल नाही तरी महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार येणार आहे,” महाराष्ट्रात दोन भूमिका असलेले पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. एकीकडे भारताला सर्वस्व मानणारी भाजपा आणि मित्रपक्ष. दुसरीकडे आपल्या कुटुंबालाच आपले सर्वस्व माननारे राष्ट्रवादी-काँग्रेसवाले. राष्ट्रवादी भूमिका असलेल्या पक्षासोबत जायचं की घराणेशाही असलेल्या पक्षासोबत जायचे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवाव,” असं आवाहनही शाह यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post