हात वर करुन मतदान घेतले तरीही भाजपच जिंकेल : चंद्रकांत पाटील


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शरद पवार यांनी ईव्हीएमला दोष देऊ नये. लोकांच्या मनात नरेंद्र आणि देवेंद्र आहेत. लोकांनी हात वर करुन मतदान करण्याची पद्धत परत आणली, तरीही भाजपच जिंकेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
युतीची सर्वस्वी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. योग्य वेळी ते जाहीर करतील. केंद्रीय मंत्री अमित शाह हे 370 कलमबाबत व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्यामुळे युतीसाठी मध्यस्थी करण्याचा त्यांचा प्रश्नच नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post