लँडर 'विक्रम' सापडले; 'ऑर्बिटर'ने काढले फोटो


एएमसी मिरर : वेब न्यूज
चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहिमेत संपर्क तुटल्याने अंतरिक्षात हरवलेल्या लँडर ‘विक्रम’ला  इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. ‘ऑर्बिटर’ने लँडरचे फोटो काढले; पण अजून विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती  इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.


या संदर्भात उल्लेखनीय आहे की, विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर शनिवारी (७ सप्टेंबर) सिवन म्हणाले होते की, पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहू. त्यांच्या या प्रयत्नाला लगेच आंशिक यश मिळाले आहे. आता विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर ठरल्याप्रमाणे विक्रमला चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न करता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post