‘चांद्रयान 2’ : ‘विक्रम’चा 1.54 वाजता संपर्क तुटला


एएमसी मिरर : वेब न्यूज
मिशन चांद्रयान 2 मोहिमेत रात्री 2 वाजण्याच्या सुमारास व्यत्यय आला. शेवटच्या 15 मिनटात संपूर्ण जग या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आतुर झाले होते. मात्र, शेवटच्या काही क्षणातच भारताच्या स्वप्नावर पाणी फिरले. चंद्रावर उतरण्याच्या आधीच ‘चांद्रयान 2’चा संपर्क तुटला. सॉप्ट लँडीग यशस्वी न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 2 वाजता इस्रो कार्यालयातून बाहेर पडले.
रात्री 2 वाजून 03 मिनटांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान 2’शी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यशही आले. परंतु ते थोड्या वेळापुरतेच मर्यादीत ठरले. विक्रमशी संपर्क प्रस्तापित झाल्यानंतर सर्वांच्या चेहर्‍यावर पुन्हा एकदा आनंद दिसून आला. परंतु 2.1 किलोमीटरवर विक्रमचा संपर्क तुटल्याने पुढील कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे चंद्रावर उतरण्याच्या तयारीत असतांना त्याच्या वेगात काही अंतर पडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र संपर्क कधी होत होता तर कधी नाही त्यामुळे सर्वांच्या चेहर्‍यावर पुन्हा एकदा तनाव निर्माण झाला. शेवटी भारताने या चांद्रयान मोहिमेत शेवेटच्या 15 मिनीटांमध्ये घोळ झाल्याचे समोर आहे. याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आल्याने ते इस्त्रोच्या कार्यालयातून निघून गेले.

उतार-चढाव येत असतो!
यावेळी इस्त्रोच्या कार्यालयातून बाहेर पडतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्राज्ञांचे मनोबल वाढवतांना जिवनात उतार-चढाव येतच असतो. तुमच्या कार्यावर देशाला गर्व आहे. आता ‘चांद्रयान 2’चा संपर्क तुटला असला तरी आपल्याला यातून नवीन काहीतरी माहिती मिळेल. निराश होवू नका? आगामी काळात आपलेल्या भरपूर काही करायचे आहे. ही केवळ सुरुवात आहे. आजपर्यंत जे केले ते कमी नाही, असे सांगत शास्त्राज्ञांचे मनोबल वाढविले.

…अन् धडधड वाढली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ठिक 1 वाजता इस्त्रोच्या कार्यालयात पोहचले. याठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 1.33 मिनीटापासून नरेंद्र मोदी थेट प्रक्षेपण पाहत असतांना धिरगंभीर झाले. ठिक 1.43 मिनीटांनी ‘चांद्रयान 2’ चंद्रपासून फक्त 12 किलो मीटर अंतरावर असतांना सर्वांच्या उरात धडकी भरली. त्यानंतर 1.48 मिनीटांनी हे चंद्रयान 6 किलो मीटर अंतरावर येवून पोहचले. यावेळी देशवासियांसह नरेंद्र मोदींचीही धडधड वाढली. शेवटी 1.54 मिनीटांनी संपर्क तुटल्याने ‘चांद्रयान 2’ने चंद्रावर आपले लँडींग झाले की नाही हे समजू शकले नाही. शेवटच्या 15 मिनीटात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या मोहिमेबाबत देशात उत्स्कुता होती.

Post a Comment

Previous Post Next Post