गणेशभक्तांसाठी तीन दिवस रात्री उशिरापर्यंत बस सेवा


एएमसी मिरर : नगर
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त उपनगरी भागातून शहरात गणेश मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी येणार्‍या गणेशभक्तांच्या सोयीसाठी तीन दिवस रात्री उशिरापर्यंत शहर बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय दीपाली ट्रान्सपोर्ट या अभिकर्ता संस्थेने घेतला आहे.
याबाबत माहिती देताना दीपाली ट्रान्सपोर्टचे प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहण्यासाठी उपनगरी भागातून येणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवार, दि.9 सप्टेंबर ते बुधवार, दि.11 सप्टेंबर असे तीन दिवस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच दररोज ही बससेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते मात्र हे तीन दिवस बससेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या बसेस माळीवाडा बसस्थानक व निलक्रांती चौक (दिल्लीगेट) येथून सोडल्या जाणार आहेत. निर्मलनगर, निंबळक व डॉक्टर विखे पा. हॉस्पिटल या तीन मार्गांवर ही व्यवस्था करण्यात आली असून गणेशभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपाली ट्रान्सपोर्ट व्यवस्थापनाच्यावतीने प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post