एएमसी मिरर : वेब न्यूज
रस्त्यावर होर्डिंग लावणे योग्य नाही, यापुढे होर्डिंगबाजी करु नये, होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. पुण्यात ते बोलत होते.
महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची होर्डिंग लावण्याची चढाओढ लागली होती. ज्या ज्या शहरात यात्रा जात आहे, तिथे शहरातील कोपरांकोपरा स्वागताच्या फ्लेक्स, बॅनरने व्यापली जात आहे. या माध्यमातून होत असलेल्या वैयक्तिक शक्तीप्रदर्शनाची व त्यावर होत असलेल्या तीची मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. रस्त्यावर होर्डिंग लावणे योग्य नाही, यापुढे होर्डिंगबाजी करु नये, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Post a Comment