'छत्रपतींनी आदेश द्यायचा, मागणी करायची नसते'


एएमसी मिरर : वेब न्यूज
छत्रपतींना मागणी करायची नाही, तर आदेश द्यायचा असतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे व शिवेंद्रराजेंनी मागणी केलेली सर्व कामे आपण मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच, या दोन्ही राजांनी भाजपात प्रवेश करताना कोणतीही अट ठेवली नाही. केवळ जनतेच्या कामांची यादी दिली असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे सातारा येथे आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली, तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत या दोन्ही राजांनी तुम्हाला इतकं दिलं याचा तुम्हाला विसर पडला आहे. छत्रपतींच घराणं हे देणारं आहे, घेणारं नाही. विधानसभेबरोबर आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत या दोघांनाही प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.
आज जे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे राजे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post