'बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा आ भतीजा'


एएमसी मिरर : वेब न्यूज
'बूरे कामों का बूरा नतीजा, सुनो भाई, चाचा आ भतिजा', अशा खोचक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या बारामतीत आहे. तेथे जाहीर सभेत ते बोलत होते.
आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली, त्यापेक्षा अधिक कामं युती सरकारनं केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.तर पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यांच्याकडे प्रचंड गळती लागलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजही भाजपसोबत आहेत. ज्यावेळी बारामतीकडे येण्यासाठी मी निघालो तेव्हा सांगण्यात आलं की, आपल्या साऊंड सिस्टीमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. येवढा धसका त्यांनी घेतलाय. पण आम्ही नरेंद्र मोदी यांचे बाशींदे आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post