उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : आंबटकर


एएमसी मिरर : नगर
कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा, हे मुख्यमंत्री व संबंधित टीम ठरविणार आहे. आपण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे मत भाजपचे सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभेसाठी उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. या वेळी पत्रकार परिषदेत आंबटकर बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते.
आंबटकर म्हणाले, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. इच्छुकांच्या वन टू वन मुलाखती घेण्यात आल्या आहेत. याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर ठेवण्यात येईल. युती होईल की नाही, याबाबत मुख्यमंत्रीच बोलू शकतील. परंतु भाजपच्या वतीने सर्व मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी झाली असून, योग्य उमेदवार दिला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post