विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे्. दोघांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दोघांमध्ये 50:50 चा फॉर्म्यूला ठरला आणि 125-125 जागा लढवण्याचे जाहीर केले. तर मित्रपक्षांना 38 जागा देण्यात आल्या. यानंतर शरद पवार यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली होती. परंतु काँग्रेसने अद्यापही कोणत्याही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नव्हता. अखेर पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.