एएमसी मिरर : नगर
जिल्ह्यातील श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत आहेत. शनिवारी यात आणखी एका आमदाराची भर पडली. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी बोलताना माझ्या मनामध्ये काँग्रेसबद्दल राग नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
भाऊससाहेब कांबळे यांनी 1 सप्टेंबर रोजी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. अखेर शनिवारी, 7 सप्टेंबरला त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Post a Comment