एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणार असून, तर उर्वरित मित्रपक्षांसाठी ३८ जागां शिल्लक ठेवल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीबद्दल चर्चा सुरू आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड येथे दिली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणार आहे. तर आघाडीतील मित्रपक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहे. त्यातील काही जागा शिल्लक राहिल्या तर दोन्ही पक्ष समसमान वाटून घेईल. काही जागांच्या अदलाबदलीबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. त्याविषयी लवकरच निर्णय होईल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Post a Comment