'भाजप कार्यालयातच ईडी, सीबीआयच्या शाखा सुरू करा'


एएमसी मिरर : वेब न्यूज
शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसेचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाना साधला आहे. ईडी, सीबीआयच्या शाखा, कार्यालये एवढी दूर का? भाजपाच्या कार्यालयातच यांच्या शाखा सुरू करा, राज्यकर्त्यांची काळजी वाटते म्हणून हा सल्ला!, असा सल्ला सावंत यांनी दिला आहे.
सावंत म्हणाले, सरकारने तातडीने नवीन जेल बनवायला सुरुवात करावी. पुढे विरोधकांकरीता जेलमध्ये जागा कमी पडायला नको. उगीचच सरकारला आयत्या वेळी डोकेदुखी, नाही का?. ED, CBI, Income Tax ची कार्यालये एवढी दूर का? भाजपाच्या कार्यालयातच यांच्या शाखा सुरू करा राज्यकर्त्यांची काळजी वाटते म्हणून हा सल्ला!, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post