माझ्या विरोधात कोणताही उमेदवार द्या जिंकणार तर मीच : थोरात


एएमसी मिरर : संगमनेर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी शालिनी विखें-पाटील यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्याच्या चर्चेवर आपले रोख ठोक मत व्यक्त केले.
'काँग्रेस आणि राज्य घटनेच्या विचारांवर मी सतत लढतो आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदार माझ्याबरोबर आहेत मला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज नाही. येथील मतदार आणि माझ्यात एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे  माझ्या समोरचा उमेदवार कोण आहे याची मला अजिबात काळजी नाही.' असे रोख ठोक मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब थोरात एका कार्यक्रमासाठी संगमनेरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण काँग्रेसचे विचार आणि तत्वांशी बांधीलकी आहे असे मानणारे आहोत. मतदार माझ्यासोबत असल्यामुळे मी चांगले मताधिक्य मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत जाणार आहे. माझ्या विरोधात शालिनी विखें की अन्य कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची हा निर्णय त्यांचा आहे असे मत आ थोरात यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे  यांना उद्देशून आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post