युद्धात हारू; पण परिणाम गंभीर होतील : इम्रानची धमकी


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा अणुबाँब टाकण्याची धमकी दिली आहे. आम्ही पारंपरिक युद्ध हारू; पण कोणताही अण्वस्त्र संपन्न देश अंतिम श्वासापर्यंत लढतो तेंव्हा त्या युद्धाचा शेवट गंभीर होतो, असा ईशाराच इम्रान खान यांनी दिला आहे.
एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मी युद्धाच्या विरुद्ध आहे. पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. माझे मत आहे की, युद्धामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. व्हिएतनाम, इराकच्या युद्धांचा अनुभव असा आहे की, या युद्धांमुळे नवीन प्रश्न निर्माण झालेत आणि ते मूळ प्रश्नांपेक्षाही अधिक गुंतागुंतीचे आहेत. अणुवस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होते तेंव्हा त्याचा शेवट अणुवस्त्रांनीच होण्याची शक्यता असते. आम्ही भारतासोबतचे पारंपरिक युद्ध जिंकू शकत नाही. युद्ध हारण्याच्या स्थितीत पाकिस्तान पुढे दोनच पर्याय शिल्लक असतील, आत्मसमर्पण करणे किंवा अंतिम श्वासापर्यंत लढणे. पाकिस्तान अंतिम श्वासापर्यंत लढेन. जेंव्हा कोणताही अण्वस्त्र संपन्न देश अंतिम श्वासापर्यंत लढतो तेंव्हा त्या युद्धाचा शेवट गंभीर होतो.

Post a Comment

Previous Post Next Post