विक्रमशी संपर्क धूसर; इस्रोची गगनयानची तयारी सुरू


एएमसी मिरर : वेब न्यूज
चांद्रयान-२ च्या अपयशानंतरही इस्रो नासाच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र नासाने घेतलेल्या छयाचित्रातही विक्रम चंद्रावर सॉफ़्ट लँडिंग करण्यात अपयशी झाल्याने चांद्रयान-२ मोहीम अपयशी झाला आणि विक्रमशी संपर्क होण्याची आशाही आता धूसर झाली आहे. यामुळे इस्रोने आता गगनयानची तयारी सुरू केली असून पुढील दोन वर्षात हे यान अंतराळात झेपावणारे आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) गगनयान प्रकल्पासाठी डिसेंबर २०२० मध्ये पहिली फ्लाईट सोडणार आहे. यानंतर जुलै २०२१ मध्ये दुसरे मानवरहित फ्लाईट अंतराळात पाठविणार असल्याची घोषणा इस्त्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी सांगितले. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये तिसरी फ्लाईट पाठविणार असून यातून पहिल्यांदाच भारतीय शास्त्रज्ञ अंतराळवारी करणार आहेत.
गगनयान भारतासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. ही मोहीम देशाची विज्ञान आणि प्रौद्योगिक क्षमतेला वाढविणार आहे. सिवन यांनी चांद्रयान-२ ची माहिती देताना इस्त्रोचे पुढील उद्दीष्ट गगनयान असल्याचे स्पष्ट केले होते.
यापूर्वी ६ सप्टेंबरला हवाईदलाने अंतराळातील पहिल्या मानव मोहिमेसाठी पायलटांच्या भरतीची पहिली प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. हवाईदलाने टेस्ट पायलटांसाठी फिजिकल एक्सरसाईज टेस्ट, लॅब इन्व्हेस्टिगेशन, रेडिओलॉजिकल टेस्ट, क्लिनिकल टेस्ट आणि सायकॉलॉजिकल स्तरावर मुल्यांकन करण्यात आले होते.
डिसेंबर २०२१ मध्ये गगनयान मोहिमेसाठी ‘क्रू सिलेक्शन’ आणि ट्रेनिंग दिलेल्यांपैकी तीन वैमानिकांना पाठविण्यात येणार आहे. हे वैमानिक अंतराळात कमीतकमी सात दिवस राहणार आहेत. या यानाला जीएसएलव्ही मार्क-३ द्वारे अंतराळात पाठविले जाणार आहे.
या वैमानिकांना रशियामध्ये प्रशिक्षित केले जाणार आहे. गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ मध्ये लालकिल्ल्यावरून केली होती. या मोहिमेसाठी १० हजार कोटींचा खर्च येणार आहे. या खर्चालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. चांद्रयान-२ चे अपयश भरून काढत नवीन इतिहास रचण्यासाठी इस्रोचा प्रयत्न सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post