देशाच्या प्रगतीचा वेग थक्क करणारा : मोदी


एएमसी मिरर : वेब न्यूज
प्रत्येक भारतीयाला आमचे सरकार सामाजिक सुरक्षा कवच आणि विकास ही आमची प्राथमिकता असून आम्ही मार्चपासून अशी पेन्शन योजना राबवली आहे जी की, असंघटित क्षेत्रातील कामगारांना फायदेशीर ठरत आहे. विकास ही आमची प्राथमिकता आहे. विकासाचा आम्ही केलेल्या आश्वासनाही अजूनही ठाम आहोत. आज ज्या वेगाने देश प्रगती करतोय तो वेग थक्क करणारा असल्याचेही मोदी म्हणाले.
झारखंडमधील रांची शहरातील विधानसभेच्या भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मोदींनी किसान मानधन योजनेचा शुभारंभ केला आहे. मोदींनी अनेक विकास परियोजनांचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आयुष्यमान भारतसह शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची सुरुवात केली आहे. गेल्या 100 दिवसांत देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पोहचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, त्यावर कामदेखील सुरू आहे आणि काही जण गेले देखील आहेत.
‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी २२ कोटींपेक्षा जास्त देशवासी जुडले असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, यातील 30 लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत, असे मोदींनी सांगितले. मोदींनी साहेबगंज येथील मल्टी मॉडेल हबचे उद्घाटन केले असून, या जलमार्गाद्वारे बांगलादेश, म्यानमार व इतर काही देशांमध्येही मालाची वाहतूक करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post