'किस्मत बदले ना बदले पर वक्त जरुर बदलता है’


एएमसी मिरर : वेब न्यूज
‘रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवाँ बदलता है, जज्बा रखो जीतने का क्यूँकी किस्मत बदले ना बदले पर वक्त जरुर बदलता है’ असे ट्विट करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून याचा निषेध केला जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते! याचा अर्थ कळतो काय महाराष्ट्रा?" असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post