रॉबर्ट वढेरांच्या अटकेची मागणी; ईडीचे हायकोर्टाला साकडे


एएमसी मिरर : वेब न्यूज
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे ईडीने गुरुवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणीदरम्यान सांगितले आहे. वढेरा चौकशीत सहकार्य करीत नसल्याचेही ईडीने म्हटले आहे. या प्रकरणावर ५ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
सत्र न्यायालयाने वढेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. कनिष्ठ कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ईडीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, हायकोर्टात न्या. चंद्रशेखर यांच्यासमोर बाजू मांडताना ईडीने वढेरा यांच्या जामीनाला विरोध केला. तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीच्या अनेक प्रकरणांशी त्यांचा थेट संबंध असल्याचा दावाही ईडीने यावेळी केला. वढेरा यांच्या वकिलांनी ईडीच्या दाव्याचा इन्कार करताना म्हटले की, ईडीने जेव्हा वढेरा यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा ते त्यांच्यासमोर हजर झाले आहेत. आजवर त्यांनी चौकशीला पूर्ण सहकार्यही केले आहे. ईडीने जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरेही त्यांनी दिली आहेत. रॉबर्ट वढेरा यांच्यावर लंडनमध्ये १२ ब्रायनस्टन स्क्वायर येथे १७ कोटी रुपयांची संपत्ती खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Post a Comment

Previous Post Next Post