अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. काही वृत्त वाहिन्यांनी याबाबत वृत्त दिल आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनियमितता आढळली होती. या सगळ्याची चौकशी आता ईडीतर्फे केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेने मनमानीने कर्ज वाटप केलं होतं. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते

Post a Comment

Previous Post Next Post