निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला मतदारसंघांचा आढावा


एएमसी मिरर : नगर
केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक के. ए. जतीन यांनी कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा येथील विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि सहायक यांची बैठक घेऊन या तीनही मतदारसंघांमध्ये करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. मतदारांच्या प्रबोधन आणि जनजागृतीसाठी आकर्षक सजविलेले मीडिया सेंटर, उमेदवारांना आणि मतदारांना सहज समजेल अशा निवडणूक प्रक्रियेचे सुलभ माहिती फलक, खर्च नियंत्रण कक्ष, मतदार सहायता कक्ष, अशा निवडणूक प्रक्रियेशी निगडित सर्व दालनांना त्यांनी भेट दिली. निवडणुकीसाठी केलेली तयारी पाहून जतीन यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी नोडल अधिकारी सी. व्ही. अंकुश, निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी निगडित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेवगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शेवगाव मतदारसंघातील विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. द्विवेदी यांच्यासमवेत प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post