नगर : पाइपलाईन रस्त्यावरील 'वाणीनगर'ची कमान कोसळली


एएमसी मिरर : नगर
येथील पाईपलाईन रस्त्यावरील वाणीनगर परिसराचे प्रवेशद्वार असलेली आरसीसी कमान बुधवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास कोसळली.
सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना कमान कोसळ्याचे दिसताच त्यांनी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती दिली. नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, नितीन बारस्कर, योगेश ठुबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपत बारस्कर यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रभारी शहर अभियंता प्रमुख सुरेश इथापे यांना माहिती दिली. इथापे यांच्यासह अभियंता मनोज पारखे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कमान कोसळल्याचे सांगण्यात येत असून, यात कुठलाही जीवितहानी झालेली नाही. कमान कोसळल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, ट्रक किंवा डंपरच्या धडकेने कमान पडली असावी, असे सांगितले जात आहे. मनपाकडून कमान हटविण्याचे काम सुरु आहे.
Post a Comment

Previous Post Next Post