'भाजपा'तील वाढत्या गर्दीमुळे किरीट सोमय्या जमिनीवर!


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपात दिवसेंदिवस नेत्यांच्या वाढत असलेल्या गर्दीचा फटका भाजपच्या जुन्या नेत्यांना बसत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात तर ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना पायरीवर बसून कार्यक्रम बघण्याची वेळ आली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निमित्तामुळे भाजपाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही उपस्थित दर्शवली होती. मात्र, व्यासपीठ हाऊसफूल असल्यामुळे त्यांना जागा मिळाली नाही. सोमय्यांना संपूर्ण कार्यक्रम व्यासपीठ आणि खुर्च्या यांच्यामध्ये असलेल्या पायऱ्यांजवळ बसून पाहावा लागला. सोमय्या समर्थकांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी भाजपतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सुत्रचंचालकांनी सोमय्या यांना व्यसपीठावर येण्याची विनंती केल्याचा दावा प्रथमदर्शनी करत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post