पूरबाधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे खराब अथवा गहाळ झाली आहेत, त्यांनी पुन्हा मागणी केल्यास दुबार पदवी प्रमाणपत्रे आणि विद्यापीठाशी निगडित इतर शैक्षणिक कागदपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात प्रथम सत्र परीक्षा शुल्कमाफी, बाधित महाविद्यालयांना अर्थसाह्य करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२ महाविद्यालयांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. या महाविद्यालयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावेत. त्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यापीठाकडून अर्थसाह्य देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post