नगर : बेलदार गल्लीत दोन गटात हाणामारी, गुन्हा दाखल


एएमसी मिरर : नगर
कुलूप तोडल्याची विचारणा केल्याचा राग येवून झालेला वादातून दोन गटात लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली. ही घटना सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथे सोमवारी (दि.9) सकाळी साडेसात वाजता घडली.
असगर अकबर सय्यद (रा. बेलदार गल्ली) यांचे कुलूप शेजारी असलेल्या सय्यद यांनी तोडले. याबाबत असगर यांनी विचारणा केली असता, त्याचा राग येवून जाकीर रफिक सय्यद (रा. मुकुंदनगर), सुफियाना शकील सय्यद, मुशारण शकील सय्यद, शाबाद सलीम सय्यद, समीर सलीम सय्यद (सर्व रा. बेलदार गल्ली) यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने असगर यांना बेदम मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दुसर्‍या फिर्यादीत जाकीर रफिक सय्यद (रा. बेलदार गल्ली) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, असगर अकबर सय्यद (रा. मुकुंदनगर), कैसर असगर सय्यद, जाहीर असगर सय्यद, सानिबर, नाजीया (पूर्ण नाव माहित नाही. रा. कोस्मिक कॉलनी, बालिकाश्रम कॉलनी अ.नगर) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे. कॉ. जपे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post