पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग; २२ ठार


एएमसी मिरर : वेब न्यूज
पंजाबमधील गुरुदास जिल्ह्याच्या बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांत भीती पसरली आहे. याशिवाय दोन इमारतीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहेत.
त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहेत. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहे. स्फोटानंतर या
ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. या धुरामुळे लोकांना बाहेर काढताना अडचण येत आहे, असे बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दरम्यान, या कारखान्या परवानगी होती की तो अनधिकृत होता याची अद्याप माहिती समोर आली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post